मॅक्झिम गॉर्कीने साहित्यिकांना एक प्रश्न विचारला होता. सुरेश भटांनी त्याचे उत्तर आपल्या सामाजिक-राजकीय आशयाच्या कवितांतून स्पष्टपणे दिले आहे!
भटांनी जशा उत्कृष्ट प्रणय कविता लिहिल्या, तशा श्रेष्ठ दर्जाच्या सामाजिक आणि राजकीय आशयाच्या कविताही लिहिल्या आहेत. चांगला कवी हा आधी संवेदनशील माणूस असावा लागतो. असा कवी सामाजिक सुख-दुःखांपासून स्वतःला अलिप्त ठेवू शकत नाही. तो कोट्यवधी सामान्य माणसांचा प्रवक्ता झालेला असतो. सुरेश भटांची कविता दलित-पीडित-वंचित जनतेचा असा बुलंद आवाज झालेली आहे.......